नगर | शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने स्वराज सप्ताह
Updated On:

शिर्डी, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने राज्यभरात शिवजंयती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिर्डी परिसरात दि.१२ ते दि १८ फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी दिली.
शिर्डी शहरात होणाऱ्या या उत्सवानिमित्त राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, बाबासाहेब कोते यांच्या अध्यक्षतेखाली राहाता तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक पार पडली. बैठकीप्रसंगी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते , शिर्डी शहरध्यक्ष दीपक गोंदकर , युवक शहरध्यक्ष नीलेश शिंदे ,साई कोतकर,फकीरा लोढा, युनूस सय्यद, अजित जगताप , सद्दाम सय्यद आदींसह राहाता तालुक्यातील राष्ट्रवादी कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





