दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘स्वामिनी’त विविध साड्यांची रेलचेल; ‘नावेद-जावेद’ घेऊन आले खास कलेक्शन

पुणे – पारंपरिक, फॅन्सी, डिझायनर्स अशा वैविध्यपूर्ण साड्यांसाठी चोखंदळ महिलांच्या पसंतीचे एकमेव नाव म्हणजे कुमठेकर रोडवरचे साड्यांची महाराणी ’स्वामिनी. दिवाळीचा सिझन येतो तेंव्हा तर बाहेरगावच्या महिलापण आवर्जून स्वामिनी मध्ये खरेदीसाठी येतात.
त्यापूर्वी काही महिने भरतील प्रत्येक प्रांतात जाऊन तेथील नामवंत विणकरांच्या साड्या खास आपल्या महिला भगिनींचा सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी स्वामिनीचे संचालक नावेद आणि जावेद घेऊन येतात. त्यामुळे स्वामिनीचे दालन नाविन्यपूर्ण कलात्मक आणि वैविध्यपूर्ण साड्यांनी बहरलेले असते. दिवाळीतल्या प्रत्येक सणासाठी आता नवी साडी नेसायची असेल तर इथे स्वामिनीमध्ये या. फॅन्सी, डियाझानर्स, ट्रॅडिशनल तसेच नऊवारी, पैठणी अशा सर्व प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव आणि आदर करणे ही स्वामिनीची परंपरा आहे. इतिहासातील थोर पराक्रमी महिलांचा गौरव करताना त्यांना वंदन म्हणून त्यांच्या नावाने खास साडी बनवली जाते. निवृत्त होणार्या शिक्षिकेला गुरुदेव साडीने निरोप दिला जातो. तर महिला पोलिसांना अष्टभुजा साडी अर्पण केली जाते. 80 वर्षांवरील प्रत्येक स्त्रीला जिजाऊ सन्मानाने गौरवले जाते.
महिलांची अभिरुची जपताना स्वामिनी समाज माध्यमांमध्येही आपला वेगळा ठसा उमटवत आहे. युट्युब, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्वामिनी वेगवेगळया आविष्कारात भेटत असते. तसेच आकाशवाणीवर आदीशक्ती, नद्यांची कहाणी -जीवनदायीनी, व्रतकथामाला अशा अनेक कार्यक्रमांमधून आपल्या थोर भारतीय संस्कृतीचे दर्शनही घडवत असते. त्यामुळेच भिन्न अभिरुचीच्या प्रत्येक स्त्रीच्या मनात स्वामिनीने एक अढळ स्थान निर्माण केले आहे. आणि म्हणूनच दिवाळीच्या मंगलमय सणामध्ये स्वामिनीमध्ये खरेदी व्हायलाच हवी, कारण तुमची साडी लाखात उठून दिसायलाच हवी.





