Suvendu Adhikari PA Shot Dead: पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत विजयमिळवला आहे. मात्र भाजपच्या विजयाच्या आनंदात विरजण पडल्याचे दिसत आहे. निवडणुकीनंतर आता राज्यात रक्तरंजित संघर्षाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. बुधवारी रात्री या संघर्षाने टोक गाठले.पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम (बारासात प्रदेश) येथून एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप नेते आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते, चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपचा तृणमूल काँग्रेसवर आरोप Suvendu Adhikari PA Shot Dead: भाजप नेते आणि नवनिर्वाचित आमदार कौस्तव बागची म्हणाले, “हा एक पूर्वनियोजित हल्ला होता. हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांच्या गाडीचा बराच वेळ पाठलाग केला आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार केला.” त्यांनी आरोप करत, “हा ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांचा कट आहे. जोपर्यंत गुन्हेगारांची ओळख पटत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही.” असे त्यांनी म्हटले. भाजप आमदार तरुणज्योती तिवारी यांनी , “आम्ही शांततेचा उपदेश करत आलो आहोत, पण तृणमूल काँग्रेसने मोठी चूक केली आहे.” म्हटले. ‘टीएमसी लुटारू आणि खुन्यांचा पक्ष ‘ Suvendu Adhikari PA Shot Dead: भाजप नेत्या केया घोष म्हणाल्या, “चंद्रनाथ रथ यांनी भवानीपूर निवडणुकीत खूप मेहनत घेतली, जिथे सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ऐतिहासिक विजय मिळवला. आता या सर्व गोष्टी एकत्र करा. म्हणूनच मी नेहमी म्हणते की टीएमसी लुटारू आणि खुन्यांचा पक्ष आहे. सुवेंदूच्या पीएने इतकी मेहनत घेतली, म्हणून टीएमसीने राग, निराशा आणि द्वेषापोटी त्यांना लक्ष्य केले. पण नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, ज्यांनी चंद्रा यांच्या हत्येसाठी गोळी झाडली आणि ‘सुपारी’ दिली, त्यांना सोडले जाणार नाही.” राजकीय तज्ञ तेहसीन पूनावाला म्हणाले, “पश्चिम बंगालमधील मध्यग्रामजवळ भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्र यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी वाचून माझे मन हेलावले आहे. ही अत्यंत दुःखद बातमी असून ती आपल्या भारतीय मूल्यांच्या विरोधात आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाचा आढावा घेऊन दोषींना शिक्षा होईल याची खात्री करावी. चंद्र यांच्या कुटुंबीयांना आणि सुवेंदू अधिकारी यांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.” ओम शांती. टीएमसीकडून घटनेचा निषेध टीएमसीने या घटनेचा निषेध केला असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे, “मध्यग्राममध्ये चंद्रनाथ रथ यांची निर्घृण हत्या, तसेच गेल्या तीन दिवसांपासून भाजप-समर्थित समाजकंटकांनी निवडणुकीनंतर केलेल्या हिंसाचारात कथितरित्या झालेल्या इतर तीन टीएमसी कार्यकर्त्यांच्या हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो. या प्रकरणात कठोर कारवाईची, तसेच न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची आम्ही मागणी करतो, जेणेकरून गुन्हेगारांना ओळखून त्यांना शिक्षा करता येईल. लोकशाहीत हिंसाचार आणि राजकीय हत्यांना स्थान नाही आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे.” सयानी घोष यांची कठोर कारवाईची मागणी टीएमसी खासदार सयानी घोष म्हणाल्या, “चंद्रनाथ रथ यांच्यासोबत घडलेली घटना अत्यंत चिंताजनक आहे. राजकीय आणि वैचारिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन, सत्तेवर कोणीही असले तरी, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अशा प्रकारे कोणाचाही जीव जाता कामा नये.” गेल्या काही दिवसांपासून झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्या प्रत्येक गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन मी पोलीस प्रशासनाला केले आहे. राजकीय तज्ज्ञ तेहसीन पूनावाला म्हणाले, “पश्चिम बंगालमधील मध्यमग्रामजवळ भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्र यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी वाचून माझे मन हेलावले आहे. ही अत्यंत दुःखद बातमी असून ती आपल्या भारताच्या मूल्यांच्या विरोधात आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाचा आढावा घ्यावा आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे. चंद्र यांच्या कुटुंबीयांना आणि सुवेंदू अधिकारी यांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. ओम शांती.” डीजीपी काय म्हणाले? Suvendu Adhikari PA Shot Dead: सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचा मृत्यूबाबत, डीजीपी सिद्धनाथ गुप्ता म्हणाले, “आम्ही तपास सुरू केला आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. त्याच्या नंबर प्लेटमध्ये फेरफार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. वापरलेली नंबर प्लेट सिलीगुडी येथील एका वाहनाची आहे, परंतु ती बनावट आहे. आम्ही घटनास्थळावरून काही रिकामी आणि जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत.” आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही कारवाई करत आहोत आणि सध्या मी एवढीच माहिती देऊ शकेन. मध्यग्राम परिसरात चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार झाला. ते गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर लगेचच स्थानिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या डायव्हर्सिटी नर्सिंग होममध्ये नेण्यात आले, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हत्येचा आरोप टीएमसी कार्यकर्त्यांवर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.