Nagar | सावेडीच्या मंडल अधिकारी, तलाठी यांना निलंबित करा

नगर, (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील सावेडी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल असून हे अधिकारी त्या ठिकाणीच कामकाज करत आहेत.
मंडलाधिकारी व तलाठी यांची भूमिका संशयस्पद असून त्यांना तत्काळ निलंबित, करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवप्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले
यावेळी शिवप्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरक्षनाथ आढाव, शिवाजी लहारे, माणिक झिने, निवृत्ती झिने, संतोष घोलप, महादेव भोसले, शुभम भोंदे, आदिनाथ झिने, एकनाथ झिने आदी उपस्थित होते.
सावेडी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते व तलाठी सागर एकनाथ भापकर यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
त्या अनुषंगाने देवकाते व भापकर यांना शासन सेवेतून निलंबित करावे अशी मागणी यावेळी करण्यात आले. यावेळी हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले.





