निलंबित पोलीसच खुनी हल्ल्याचा सूत्रधार

शिरूर – करडे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्य अंकुश बांदल यांचे वर चोरीच्या उद्देशाने खुनी हल्ला केल्याच्या प्रकरणात चार आरोपी निष्पन्न झाले असून याचा सूत्रधार हा पुणे ग्रामीणचे गुन्हे अन्वेषण विभागाचा निलंबित पोलीस पोपट गायकवाड निघाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या गुन्ह्याबाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी मोठ्या शिताफीने तपास करून यातील चार आरोपींपैकी दोघांना अटक केली आहे. समीर ऊर्फ करवंद्या काळे व अमोल विश्‍वास ओहळ अशी त्यांची नावे आहेत. तर निलंबित पोलीस पोपट गायकवाड व अजित जाधव हे दोघे फरार आहेत. करडे येथील अंकुश सुदाम बांदल यांच्यावर एक सप्टेंबर रोजी सायंकाळी दोन जणांनी हत्यारासह हल्ला करून, त्यांच्याजवळील सुमारे अडीच लाखांचे सोने लुटत जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये ग्रामस्थ व पोलीस अधिकारी प्रविण खानापुरे यांच्या सर्तकतेमुळे हल्ला करणारा समिर उर्फ करवंद्या काळे (वय 29, रा. सोनगाव, ता. बारामती) याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर पोलिसांनी अमोल विश्‍वनाथ ओव्हळ (रा. पेरणे फाटा, ता. हवेली) याला पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर , त्यांनी निलबिंत पोलिस शिपाई पोपट मुरलीधर गायकवाड यांच्या सांगण्युनुसार बांदल यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितल्याची माहीती सुत्रांनी दिली. यांनी पोलिस दलात मोठी खळबळ माजली असून, या गुन्ह्याचा मास्टर माइन्ड पोपट गायकवाड असल्याची चर्चा तालुक्‍यात होती.

पोपट गायकवाडने घटना घडली त्या दिवशी, सोने घातलेल्या अंकुश बांदल हे या तीन आरोपीना दाखविले असल्याचे उघड झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी निघोज (ता. पारनेर) येथील व्यापाऱ्यांचे गोदाम फोडून लाखो रुपयांचा गुटखा चोरीचा गुन्हा पोपट गायकवाड याच्यावर दाखल झाल्यापासून तो निलंबित व फरारी आहे.

खाकीतील दरोडेखोर
या गुन्ह्यातील समीर काळे हा आरोपी जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर बरा झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन या गुन्ह्याचा तपास केला. खाकीच्या माध्यमातून अनेक गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींसोबत त्याची मैत्री असून, त्यांचा उपयोग चोरी, दरोडे टाकुन पैसे कमविण्यांचे काम, या खाकीमधील दरोडेखोरांनी केले आहे. त्यांची पाठराखण काही वरिष्ठांनी केल्याने त्याला बळ भेटत असल्याची चर्चा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here