Sushma Andhare : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्याविरुद्ध बलात्कार, नरबळी आणि जादूटोण्याचा आरोप असलेल्या प्रकरणात रविवारी एसआयटीने नाशिकमधील ईशानेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि एका सुरक्षारक्षकाची चौकशी केली. या कारवाईमुळे खरातच्या बाबतीतील अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. या प्रकरणावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही लक्ष केले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक या सोशल मीडिया माध्यमावर चाकणकर आणि तटकरेंचा वेगवेगळा फोटो शेअर केला आहे. मात्र यातील एक साम्य दाखवणारी गोष्ट त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. ‘एकसारखे रुद्राक्ष माळेचे गंडे हा निव्वळ योगायोग आहे’ हे फोटो शेअर करी सुषमा अंधारे यांनी ‘एकसारखे रुद्राक्ष माळेचे गंडे हा निव्वळ योगायोग आहे,’ असा मजकूर लिहला आहे. मुख्य म्हणजे यात सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या हातात एकसारखे रुद्राक्ष माळ दिसत असून त्यावर लाल रंगाने मार्क करत लक्ष वेधले आहे. यामुळे या फोटोने चर्चेला उधाण आले आहे. खरातवर गंभीर गुन्हे दाखल दरम्यान, खरातवर वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणी, ब्लॅकमेलिंग, बलात्कार आणि जादूटोण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्यावर ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा प्रतिबंध व उच्चाटन कायद्या’नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, खरातने स्वतः देखील दोन व्यक्तींविरुद्ध आपल्याला अश्लील फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल केल्याची तक्रार वावी पोलीस ठाण्यात दिली आहे. हेही वाचा: Aditi Rao Hydari: रॅम्पवर अदितीचा जलवा, तर प्रेमात हरवला सिद्धार्थ… व्हिडिओ झाला व्हायरल!