“नरेश म्हस्के यांच्या अंगातला थिल्लरपणा कायम” ; सुषमा अंधारेंची जळजळीत टीका

Sushma Andhare on Naresh Mhaske । लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील ठाकरे-शिंदे गटात नव्याने वाद उफाळून आला आहे. या निवडणुकीत दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांचे निवडून आलेलं खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केलाय. आता यावरूनच आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. ठाकरे गटाचे नऊपैकी दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचादावा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हस्के यांचा चांगलाच समाचार घेतला.
” म्हस्केच्या अंगातला थिल्लरपणा कायम” Sushma Andhare on Naresh Mhaske ।
याविषयी बोलताना सुषमा अंधारे यांनी, “खोक्यांच्या बळावर बेईमानी करुन अपघाताने खासदार झालेल्या नरेश म्हस्के यांनी निष्ठावान आणि इमानी लोकांविषयी बोलू नये. पण अडचण अशी आहे की, नरेश म्हस्के यांच्या अंगातील छिल्लोर आणि थिल्लरपणा स्वभाव आहे तो गेलेलाच नाही. आता आपण खासदार झालोय, आता आपण थिल्लरपणा करु नये, थोडं गांभीर्याने बोललं पाहिजे, आपल्या बोलण्याला वजन असलं पाहिजे, आपण जे वक्तव्य करतो त्याचे ठोस पुरावे आपल्याकडे असले पाहिजेत, या गोष्टींचे नरेश म्हस्के यांना भानच नाही. त्यामुळे नरेश म्हस्के हे अशाप्रकारची वक्तव्यं करत असल्याचे अंधारे यांनी म्हटले.
खासदारांची नावंच जाहीर करा Sushma Andhare on Naresh Mhaske ।
नरेश म्हस्के म्हणतात, त्याप्रमाणे आमचे दोन खासदार त्यांच्या संपर्कात असतील तर त्यांनी थेट या खासदारांची नावंच जाहीर केली पाहिजेत. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला, असे करु नये. खासदार असलेल्या माणसाला हे शोभत नाही. कदाचित नरेश म्हस्के यांनाच आपण खासदार झालो, यावर विश्वास बसत नसेल. पैशांच्या जोरावर खासदारकी विकत घेतली त्याच्याकडून गांभीर्याने बोलण्याची अपेक्षा नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
नरेश म्हस्के यांनी कितीही हुजरेगिरी किंवा लांगुलचालन केलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना केंद्रात मंत्रिपद देणार नाहीत. त्यांच्या पक्षात अगोदरच प्रतापराव जाधव मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. त्यामुळे नरेश म्हस्केंनी कितीही आगाऊपणा केला तरी त्यांना मंत्रिपद मिळणार नाही. कारण मुख्यमंत्री शिंदे आपल्या पोराशिवाय इतरांकडे बघणार नाहीत. आम्ही एखाद्या छिछोर माणसावर विश्वास ठेवून आमच्या खासदारांवर शंका घेण्याचे कारण नाही. आरोप करणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा पाहिली पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे.





