शस्त्रपरवाना प्रकरणात सुषमा अंधारेंचा गृहराज्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; केली ‘ही’ मोठी मागणी, योगेश कदम यांची अडचण वाढणार?

Sushma Andhare : सध्या राज्यात कुख्यात गुंड नीलेश घायवळ प्रकरण चर्चेत आहेत. या प्रकरणावरून आरोप प्रत्योरांच्या फैरी झडू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या प्रकरणात आता नीलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला देण्यात आलेल्या शस्त्र परवानावरून राजकारण तापले आहे. नुकतेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कदम यांच्यावर गंभीर आरोप करत थेट राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या भावाला सचिन बन्सीलाल घायवळ याला शस्त्र परवाना दिला जो कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे, असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी एक्स पोस्टवर केला आहे. काल कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जाऊ नये असा पोलिसांचा अहवाल होता.
काल कुख्यात गुंड निलेश घायवळ चा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता.
सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा… pic.twitter.com/8WA5lqh611— SushmaTai Andhare (@andharesushama) October 9, 2025
तरीसुद्धा योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला. योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे, असा अत्यंत गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. पुढे त्या म्हणाल्या, सबब योगेश कदम तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही तात्काळ गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, अशीही मागणी त्यांनी केली.
शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते.
उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या…
— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) October 8, 2025
नेमकं काय म्हणाले होते गृहराज्यमंत्री योगेश कदम?
शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक्स पोस्ट शेअर करत दिले आहे.
हेही वाचा : मनसेतून आऊट अन् भाजपकडून वेटिंगवर! वैभव खेडेकरांची चलबिचल वाढली; थेट चव्हाण आणि दरेकरांची घेतली भेट .





