Sushma Andhare : कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; थेट फोटो दाखवत रुपाली चाकणकरांवर धक्कादायक आरोप
Sushma Andhare : कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांवर धक्कादायक आरोप केले आहेत.

Sushma Andhare : नाशिकमधील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची राज्यात चर्चा आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात सोबतचे फोटो व्हायरल होते असून, खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडीओ समोर आला होता. यानंतर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आता या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रुपाली चाकणकरांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हे आरोप करताना सुषमा अंधारेंनी काही फोटो दाखवले आहेत. 2 सप्टेंबर 2024 ला रोजी सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली होती. एका पीडितेने सांगितलं की रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या, असा धक्कादायक आरोप सुषमा अंधारे यांनी केला. तसेच रुपाली चाकणकरांना सर्व गुन्ह्यांची माहिती होती, असाही दावा त्यांनी केला आहे.
कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर सुषमा अंधारे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी हे आरोप रुपाली चाकणकरांवर केले आहेत. काही पीडित म्हणतात, चाकणकर आम्हाला रात्री 2-2 वाजता धमकी देत होत्या, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला आहे. चाकणकर आणि कॅप्टन खरात यांच कोणत्यावेळी काय बोलण झालं हे समोर येण गरजेचं आहे. खरातने काही लोकांची मदत मागितली का? असा सवालही अंधारेंनी उपस्थित केला आहे. Sushma Andhare
हेही वाचा : Jio Recharge: जिओचे ३६५ दिवसांचे दमदार प्लान; दररोज २.५GB डेटा आणि फ्री AI सबस्क्रिप्शन!
चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, हे सगळ करण्याअगोदर त्यांना त्या पदावरून काढलं पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. रूपाली चाकणकर फरार होण्याअगोदर त्यांचा राजकीय दबाव वापरू शकतात. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अनेकांवर दबाव आणला, असेही त्या म्हणाल्या आहेत. Sushma Andhare

Sushma Andhare
जर चाकणकर सक्रिय सहभागी दिसत असतील तर त्यांना अटक केली पाहिजे. समोरासमोर बसून चौकशी झाली पाहिजे. हा प्रश्न अनेक महिलांच्या इज्जतीचा आहे. चाकणकर यांना पदावरून बाजू केले पाहिजे. चाकणकर आणि खरात यांचे CDR तपासले पाहिजे. खरात आणि चाकणकर यांचे किती वेळा बोलणं झाले हे देखील तपासले पाहिजे. रुपाली चाकणकर यांना फरार होण्याआधी त्यांना अटक करा, अशीही मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
100 हून अधिक व्हिडिओ Sushma Andhare
कॅप्टन अशोक खरात प्रकरणात पोलिस तपासात 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे सांगितले जात होते. आता नवीन माहितीनुसार, 100 हून अधिक व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने एसआयटीची स्थापना केली असून, या पथकाच्या प्रमुख पदी पोलिस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या तपासातून ही माहिती मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.





