Suryakumar Captaincy Rumors : “मला कॅप्टन करा, नाहीतर…”, सूर्यकुमार यादवने आकाश अंबानींना दिला अल्टिमेटम?
Suryakumar Captaincy Rumors : सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे एक खळबळजनक वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे.

Suryakumar Yadav Mumbai Indians Captaincy Rumors : आयपीएल २०२७ च्या आगामी हंगामापूर्वीच मुंबई इंडियन्स संघात मोठ्या उलथापालथीच्या चर्चांना उधाण आले आहे. आयपीएल २०२४ मध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवणाऱ्या मुंबईची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. आता २०२६ चा हंगाम संपल्यानंतर हार्दिक पांड्या ट्रेड डीलद्वारे मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या बातम्या येत असतानाच, सोशल मीडियावर संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे एक खळबळजनक वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावरील धक्कादायक दावा काय आहे?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सूर्याबाबत असा दावा केला जात आहे की, त्याने मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला थेट अल्टिमेटम दिला आहे. व्हायरल पोस्ट्सनुसार, सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर मुंबई इंडियन्स मला आगामी हंगामासाठी कर्णधार बनवणार नसेल, तर मला संघातून तातडीने रिलीज करा.”
🚨 Big Breaking News 🚨
Suryakumar Yadav had reportedly told Akash Ambani that if Mumbai Indians were not going to make him captain, they should release him.
Now, Akash Ambani has accepted the proposal, and Suryakumar Yadav is set to become the next captain of Mumbai Indians.… pic.twitter.com/nm2lR8bDWX
— Central Cricket (@arshdeep3444) June 27, 2026
इतकेच नव्हे तर, आकाश अंबानी यांनी सूर्याचा हा प्रस्ताव मान्य केला असून तोच मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार बनणार आहे, असाही दावा केला जात आहे. तसेच सूर्यकुमारने मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया पेजला पुन्हा फॉलो करण्यास सुरुवात केल्याचे या पोस्ट्समध्ये म्हटले आहे.
काय आहे या खळबळजनक बातमीमागचे खरे सत्य?
🚨SURYAKUMAR YADAV TO CAPTAIN MUMBAI INDIANS❓🚨
– Suryakumar Yadav has followed Mumbai Indians back on Instagram.
– He has also added Mumbai Indians back to his Instagram bio.
– According to reports, SKY has demanded the captaincy from Mumbai Indians.
– Suryakumar Yadav will… pic.twitter.com/2BvIqVV77N— SportsClaus (@sportsclaus) June 27, 2026
क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवने असे कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. तसेच मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने अद्याप सूर्याला आपला नवा कर्णधार म्हणून घोषित केलेले नाही. सोशल मीडियावर सूर्यकुमारच्या नावाने व्हायरल होत असलेली ही पोस्ट पूर्णपणे ‘फेक’ म्हणजेच खोट्या अफवांवर आधारित आहे.
वास्तविक पाहता, आयपीएल २०२६ चा हंगाम संपल्यानंतर केवळ व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही सोशल मीडिया युजर्सकडून अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी अशा कोणत्याही खोट्या पोस्टवर विश्वास ठेवू नये. जोपर्यंत मुंबई इंडियन्स फ्रँचायझी स्वतः अधिकृत घोषणा करत नाही, तोपर्यंत अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका.





