Zee Marathi Serial : ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्याने दिलं तुळजाचा ‘हे’ खास सरप्राइज; व्हिलेटाइनच्या पूर्वसंध्येला सुंदर व्हिडिओ समोर

१४ फेब्रुवारीला व्हिलेटाइन डे अर्थात प्रेमाचा दिवस असून या दिवसाच्या अगोदर काही दिवसांपासूनच प्रेमाच्या सप्ताह सुरूवात झाली आहे. झी मराठी वाहिनीवर लाखात एक आमचा दादा ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेची कथा ही पाच भावंडाभोवती फिरताना दाखवण्यात आली आहे.
त्यानुसार कथेमध्ये काही ट्वीस्ट अन् टर्न येत राहतात. नुकताच या मालिकेती सूर्या आणि तुळजा यांचा सुंदर प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्या तुळजाला खास सरप्राइज देतो, यावरून या दोघांमध्ये प्रेम दिसते. लाखात एक आमचा दादा मालिका प्रेक्षकांच्या लिस्टमधील एक आवडती सिरीयल बनली आहे.
सध्या प्रेमाचा आठवडा सूरू असून व्हेलटाइन डेच्या पूर्वसंध्येला या मालिकेत प्रेममय वातावरण पाहिला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण हा सूर्यादादाच्या भूमिकेत आहे. या पात्राला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. त्याचबरोबर तुळजा हे पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवत आहे.
…अन् सुखद धक्का
या प्रोमोमध्ये तुळाजा सूर्याला शोधताना दिसत आहे. यावेळी ती सूर्याला शोधत त्याच्या घरी पोहचते. ती घरात येताच तिच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण होते. हे खास सरप्राईज पाहून तुळजाला सुखद धक्काच बसतो. या मालिकेत दिशा परदेशी, गिरीश ओके, अतुल कुडले, सुमेधा दातार, कल्याणी चौधरी, कोमल मोरे, समृद्धी साळवी, ईशा संजय, जुई तनपुरे यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर आपलं वेगळ स्थान निर्माण केले आहे.





