बारावी परीक्षेत सूर्यदत्त पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत १०० टक्के उत्तीर्ण होण्याची परंपरा बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित सूर्यदत्त पब्लिक स्कुलने कायम राखली आहे. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून सातत्याने घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
उल्लेखनीय कामगिरीबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनी विद्यार्थी, पालकांचे, तसेच समूह प्राचार्य किरण राव, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
सूर्यदत्त पब्लिक स्कुलमध्ये विज्ञान शाखेत हर्ष रुपेश भुरे (९४.३३ टक्के) याने प्रथम, रेहान शकील सय्यद (९१.८३ टक्के) याने द्वितीय, श्रुतिका संतोष निगडे (९१.५० टक्के) हिने तृतीय, सिद्धांत सचिन आडमुठे (९०.१७ टक्के) याने चौथा, तर अदिब सर्फराज मुल्ला व अन्विता आदित्य जोशी यांनी प्रत्येकी ८९.५० टक्के गुण मिळवत पाचवे स्थान पटकावले.
वाणिज्य शाखेत अनुष्का अजय कुमारने (८९.६७ टक्के) प्रथम, तनिषा अमर जोशीने (८९ टक्के) द्वितीय, सुहानी दीपक चुगने (८८.५० टक्के), आर्या अमोल लाडने (८७.५० टक्के) चतुर्थ, तर अदविता प्रसाद मेननने पाचवा क्रमांक पटकावला. कला शाखेत शरण्या चक्रवर्तीने (८८.८३ टक्के) प्रथम, फिओना तेजस बखईने (८७.५० टक्के) द्वितीय, सावनी उदयन भोरकरने (८७.१७ टक्के) तृतीय, राधा निलेश कडू (८६.६७ टक्के) चतुर्थ, तर अद्वैत ऋषिकेश उत्पातने (८५.५० टक्के) पाचवा क्रमांक पटकावला.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “निकालातील सातत्य अभिमानास्पद आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांतील परस्पर संवाद आणि साद प्रतिसाद यामुळे सर्वोत्तम कामगिरी होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच व्यक्तिमत्व विकास, प्रोत्साहन, वैयक्तिक मार्गदर्शनासह पूरक गोष्टी उपलब्ध करून दिल्या. शैक्षणिक ज्ञानासोबत जीवनाची मूल्येही शिकविण्यात येतात. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी ‘सूर्यदत्त’ परिवाराच्या वतीने भविष्यात लागणारे मार्गदर्शन, सहकार्य केले जाईल.”





