Nevasa News : ३३ वर्षाच्या सेवेनंतर नेवासा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर या दिवशी होणार सेवानिवृत्त

नेवासा : नेवासा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर हे त्यांच्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ ऑगस्ट२०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत पाटेकर यांनी जवखेडे खालसा (ता.पाथर्डी) येथे शिक्षक म्हणून तसेच आरोग्य सेवक म्हणून बाभळेश्वर,आखेगाव ढोरजळगाव येथे सेवा केली आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून खानापूर पंचायत समिती विटा जि.सांगली तसेच राहुरी व शेवगाव येथे उल्लेखनीय काम केले महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले.
तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून कामकाज करतांना त्यांनी सभासद कल्याणाच्या अनेक योजना राबवल्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र विकास सेवेत सहायक गटविकास अधिकारी पदावर पदोन्नतीच्या संधीचे पहिले मानकरी ठरले पाटेकर यांनी पंचायत समिती नेवासा येथे सहायक गटविकास अधिकारी म्हणून कामकाज करतांना पंचायत समिती नेवासा – राहुरी व शेवगाव या ठिकाणी प्रशासक तथा गटविकास अधिकारी तसेच नेवासा येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पाहिले. पंचायत समिती येवला येथे सहायक गटविकास अधिकारी म्हणून कामकाज करतांना प्रशासक तथा गटविकास अधिकारी म्हणून कामकाज पाहिले पाटेकर यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा आदर्श आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले होते पाटेकर एक उपक्रमशिल अधिकारी,उत्कृष्ट वक्ता, सुत्रसंचालक,निवेदक व लेखक आहेत.





