“धनंजय मुंडेंना याच उत्तर द्यावंच लागेल…” ; खंडणीसाठी मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाल्याचा सुरेश धसांचा आरोप

Suresh Dhas on Dhananjay Munde । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र नुकतेच सादर केले. या दोषारोपपत्रात आरोपींनी कशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली त्याचे पुरावे म्हणून फोटो जोडण्यात आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामाही दिलाय. मुंडेंच्या राजीनाम्यावरून सुरेश धस यांनी जोरदार टीका केली. त्यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा मुंडेंवर खंडणीचा आरोप लावला आहे.
धनंजय मुंडेंना याच द्यावंच लागेल Suresh Dhas on Dhananjay Munde ।
सुरेश धस म्हणाले की, सातपुड्याच्या बंगल्यावर खंडणीसाठी भेट झाली की नाही याचं उत्तर धनंजय मुंडेंना द्यावंच लागेल. पदावर असो किंवा नसो इतकं होऊनही मुंडे समर्थकांची भाषा बघा. राजीनामा घेतला तर मंत्रालयाला घेराव घालू म्हणतायत. तुमच्या जवळच्या माणसांनी काय केलं ते पहा.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलताना सुरेश धस यांनी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना,”अण्णांशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. मग संतोष देशमुख यांच्या खुनाचं पान धनंजय मुंडे यांच्या परस्पर कसं घडलं असेल? असा सवाल सुरेश धसांनी विचारला.
“आरोपींना तातडीने फाशी द्या” Suresh Dhas on Dhananjay Munde ।
पुढे बोलताना धस यांनी ,”देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाल्याचं कळलं. मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की हे इतकं बिभत्स आणि महाभयंकर आहे. राक्षस, हैवान या सगळ्यांच्या पलिकडं घटना घडलीय. ज्यांनी हे भयानक व्हिडीओ पाहिले असतील हृदय असणारा प्रत्येक जण रडला असेल. आरोपींना तातडीने फाशी द्या,” अशी मागणीही सुरेश धस यांनी केली.
आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासून आकाचा या मागे हात असल्याचा दावा केला होता. आका कोण हे त्यांनी सांगितलं नव्हतं. आता धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर सुरेश धस यांनी म्हटलं की, हमारे पिछे एक आका है, आका के पिछे और एक आका है ही गुर्मी लोकांच्या मनात होती आणि म्हणूनच हे सगळं घडलं.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा
Sambhaji Chhatrapati : आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच: संभाजीराजे छत्रपती





