पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं; सराव करताना भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू
Updated On:

लातूर – पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना औसा तालुक्यातील बुधोडा गावाजवळ घडली आहे. लातूर – औसा राष्ट्रीय महामार्गावर बुधोड गावाजवळील आलमडा मोड येथे ही घटना घडली. सूरज कांबळे असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सूरजच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरजला पोलीस व्हायचे होते. त्यामुळे तो दररोज सातत्याने पहाटे उठून सरावासाठी जात होता. मात्र यावेळी तो सरावासाठी घरातून बाहेर पडला मात्र परतलाच नाही. सकाळी पाच वाजताच्या सुमारास भरधाव वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र देखील जखमी झाला आहे. सूरज औसा तालुक्यातील अलमला गावचा रहिवासी होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.





