Suraj Chavan Apology Post | ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता सुरज चव्हाण सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. या शोमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. बिग बॉस संपल्यानंतरही स्वतःचा साधेपणा त्याने कायम जपला. चाहत्यांसह बिग बॉसमधील अनेक कलाकार मंडळींनी त्याची घरी जाऊन भेट घेतली. ज्याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र सुरजने एका पोस्टद्वारे चाहत्यांची माफी मागितली आहे.
घरातील सर्व सदस्यांसोबत त्याने एक खास नात बनवलं होतं. हे नाते तो घराबाहेरही जपताना दिसून आला. जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, वैभव चव्हाण आणि इरिना हे सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेले होते. यांच्या भेटीचे खास क्षण सूरजने सोशल मीडियावर शेअर केले होते. पण, या सर्व पोस्ट सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डिलीट झाल्या आहेत. यामुळे सूरजने पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.
सूरजची इन्स्टाग्राम पोस्ट
सूरजने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाण. माझ्या इंस्टाग्राम अकाऊंटवरती काही प्रॉब्लेम झाल्यामुळे काही खूप महत्त्वाच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवी ताईच्या पण होत्या!! यापुढे मी स्वतः लक्ष देईल आणि काळजी घेईल तरीही आपणा कुणाचे मन दुखावले असतील तर मोठ्या मनाने माफ करा!!” अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
सूरजच्या अकाऊंटवरून त्याच्या जवळच्या मित्रमंडळींच्या पोस्ट डिलीट झाल्याने सूरजच्या टीमने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. या टीमने पोस्ट शेअर करत सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा प्रॉब्लेम झाल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणचं अत्यंत बेताच्या परिस्थितीत असल्यामुळे शिक्षण पूर्ण करता आलेलं नाही. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. टिकटॉक बंद झाल्यावर तो इन्स्टाग्राम रील्स बनवून लोकप्रिय झाला. सूरजकडे पैसा आणि प्रसिद्धी आल्यानंतर अनेकांनी त्याच्या स्वभावाचा फायदा घेत त्याची फसवणूकही केली होती.
हेही वाचा:
भारतातील ‘या’ शहरांची नावं परदेशातही… ; काही आहेत सर्वात प्रसिद्ध, वाचा सविस्तर