‘हा देश एखाद्याच्या इच्छेनुसार चालवला…’ ; वक्फ दुरुस्ती विधेयकावर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान

Supriya Sule on Waqf Bill । वक्फ सुधारणा विधेयक आज संसदेत मांडले जात आहे. लोकसभेत विधेयक सादर झाल्यानंतर, त्यावर ४ एप्रिलपर्यंत चर्चा सुरू राहणार आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपले विचार मांडतील. आता याच विधेयकावर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी-सपा पक्षानेही याबाबत निवेदन दिले आहे. त्यात पक्षाची भूमिका सांगण्यात आली आहे.
बारामतीच्या राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार ) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्फ विधेयकावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी याविषयी बोलताना,”हा रणनीतीचा प्रश्न नाही तर अधिकारांचा आहे. एका मजबूत लोकशाहीमध्ये देश एखाद्याच्या इच्छेनुसार चालवला जात नाही. हा देश आपल्या संविधानानुसार चालवला जातो.” असे म्हटले आहे.
इंडिया अलायन्समध्ये चांगली चर्चा Supriya Sule on Waqf Bill ।
विधेयकावर बोलताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या,”…म्हणून आम्ही चर्चेत भाग घेऊ. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकू आणि आमचे सत्य मांडू. आम्ही सर्वजण संविधानासोबत असलेल्यांसोबत आहोत. इंडिया अलायन्सने यावर चांगली चर्चा केली आहे. आता आम्ही आमचे विचार सभागृहात मांडू.” असे म्हटले आहे.
VIDEO | Parliament Session: On Waqf (Amendment) Bill, NCP (SP) MP Supriya Sule (@supriya_sule) says, “In a strong democracy, the country is run by the Constitution. We will participate in the discussion tomorrow… We had a good discussion. Tomorrow, we will participate in the… pic.twitter.com/nzxhPJxEPu
— Press Trust of India (@PTI_News) April 1, 2025
खासदारांना व्हिप जारी Supriya Sule on Waqf Bill ।
दरम्यान , वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकावर सभागृहात सुमारे आठ तास चर्चा होणार आहे. या विधेयकावरून सत्ताधारी एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडीमध्ये जोरदार संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. विधेयक मांडण्यापूर्वीच दोन्ही गटांनी आपल्या खासदारांना व्हिप जारी करत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.
याशिवाय विरोधकांनी चर्चेची वेळ वाढवून 12 तास करण्याची मागणी केली आहे. यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील कार्य मंत्रणा समितीने विधेयकावर आठ तास चर्चेची तयारी केली आहे, जी गरजेनुसार वाढवली जाऊ शकते, असे सांगितले आहे.
हेही वाचा
टॅरिफच्या भीतीने शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये ; सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला, निफ्टी २३२०० च्या वर





