Supriya Sule on Dhananjay Munde । राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.त्यांनी राजीनामा देण्याचे कारण सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी नैतिकतेवर राजीनामा दिल्याचे म्हटले आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया देताना ट्विट केले यामध्ये त्यांनी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिला असल्याचे म्हटले. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनाही सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यात अजित पवारांनी धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असल्याचे म्हटले होते त्यावरच बोलताना सुप्रिया सुळे यांनी,” नैतिकतेमधील ‘न’ चा ही उल्लेख केलेला नाही. हा किती मोठा विरोधाभास आहे. एकीकडे नैतिकतेवर राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. अन् दुसरीकडे वैद्यकीय कारण मुंडेंनी दिलंय. यातून मोठा विरोधाभास दिसतोय. हे खूप भयानक असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. धनंजय मुंडे आणि नैतिकता याचा दुरान्वये संबंध येत नाही Supriya Sule on Dhananjay Munde । सुप्रिया सुळे यांनी याविषयी बोलताना,”जी चार्जशीट बाहेर आली. त्यातील फोटो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाहिले असतील ना? मग राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला? सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी सिडीआर समोर आणलेले आहेत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संवाद हत्येच्या अर्धा तासांमध्ये झालाय, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? 84 दिवस याकडे कानाडोळा केला. आता काय म्हणतात नैतिकतेवर राजीनामा दिला. पण ज्यांनी राजीनामा दिले ते वैद्यकीय कारणाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं. अहो राज्याला किती फसवणार? सगळं राज्य हताश झालंय. सुरेश धस म्हणतात ते सत्य आहे. धनंजय मुंडे आणि नैतिकता याचा दुरान्वये संबंध येत नाही. ते आज मुंडेंच्या ट्विट वरून स्पष्ट होतो. “असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. ही काय चेष्टा लावली आहे का? Supriya Sule on Dhananjay Munde । पुढे बोलताना त्यांनी,”नैतिकता की वैद्यकीय कारणाने राजीनामा दिला, हे आधी स्पष्ट करा. ही माणसं नाहीत, हैवान आहेत. फोटो पाहून राज्य हळहळतोय. बीड हे सुसंस्कृत शहर आहे, तिथं हे हैवान आहेत. अजित पवार आणि छगन भुजबळ यांना हा नैतिकतेने निर्णय घ्यावा, असं वाटलं असेल. मी विरोधात आहे, म्हणून विरोध करणार नाही. मी त्याचे स्वागत करेन. मी या दोन्ही नेत्यांचा आदर करते, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. पण मुंडे म्हणतात वैद्यकीय कारणाने राजीनामा दिला. ही काय चेष्टा लावली आहे का? याचं उत्तर त्यांनी द्याव. सर्व नेत्यांनी जे आरोप केलेत याची पारदर्शक तपासणी व्हायला हवी. संतोष देशमुखांच्या हत्येत ज्या कोणाचा हात असेल त्या प्रत्येकाला चौकात फाशी द्यायला हवी” अशी आग्रही मागणी करत खासदार सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला आहे. हेही वाचा ‘धनंजय मुंडेंसाठी खंडणी मागितली हे आरोपींनी सांगून टाकावे’, जरांगे पाटलांनी टीका करत मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी