Pravin Darekar : सुप्रिया सुळे-विनोद तावडे यांचा एकाच गाडीतून प्रवास; पडद्यामागे नेमकं काय सुरुऐ? प्रवीण दरेकर म्हणाले…
Pravin Darekar : जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट घेतली होती. त्यानंतर पवारांच्या पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.

Pravin Darekar : राजधानी दिल्लीत काल एक महत्वाची घडामोड घडली. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. जनजीवन मशीन संदर्भात महाराष्ट्र सदनामध्ये महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप राज्यसभा खासदार विनोद तावडे उपस्थित होते. बैठकीनंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. या प्रवासात दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयीचा तपशील समोर आलेला नाही. या एकत्रित प्रवासवरुन पडद्याआड राजकारणाची चर्चा होत असतानाच आता यावर भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे दोन्ही नेते महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्राच्या प्रश्नावर जलसंधरणासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, आणि या बैठकीनंतर जर या दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला असेल तर त्याचा आनंदच व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्रामधील लोकं हे जरी वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी देखील राजकीय मतभेद विसरून, विकासाच्या कामासाठी एकत्र येत आहेत, अशा अर्थाने आपण या भेटीकडे पाहिलं पाहिजे, त्यामुळे या दोन्ही नेत्याचा प्रवास असेल, भेटणं असेल हे महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचच असेल. त्यामध्ये दुसरा कोणता राजकीय अर्थ दडला असेल असं मला वाटत नाही.”
जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट घेतली होती. त्यानंतर पवारांच्या पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खासदारांनी मोदींची भेट घेतली. इकडे महाराष्ट्रातही कोल्हापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जाण्यासाठी जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्र विमान प्रवास झाला.
या सगळ्यात आता सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांच्या एकत्र वाहन प्रवासामुळे या घडामोडी आगामी काळात मोठ्या बदलाचे संकेत तर नाहीत नाही अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे शरद पवारांच्या मनात नेमकं काय सुरूऐ याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही असेही बोलले जात आहे. याविषयी भाष्य करताना प्रवीण दरेकर यांनी एक मोठं विधान केले आहे.
…तेव्हा आपण जुने अंदाज पहातो
“आता पवार साहेबांचं जवळ येणं आणि जाणं, याचा अंदाज लावायला मी तर फार लहान माणूस आहे. त्यांचा अंदाज जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा आपण जुने अंदाज पहातो.” असे प्रवीण दरेकर म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाची एनडीमधील घटक पक्षांसोबत जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू आहे, जवळीक वाढत असेल तर चांगलंच असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
Compressed Biogas Production: ३०० टन ओल्या कचऱ्यावर मोफत प्रक्रिया? बीपीसीएलकडून तयारी







