सुप्रिया सुळेंनी बांधली खासदार भास्कर भगरेंना राखी ; सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर तर अजित पवार मुंबईत

supriya sule । आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राज्याच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण एकत्र तर काही विरोधात काम करत आहेत. पण या सणाला विरोधी गटातील भाऊ – बहिणपण एकत्र येतात. दरम्यान , यंदाच्या रक्षाबंधनाला राज्यात कोणते भाऊ – बहीण एकत्र येणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भास्कर भगरे यांनी भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांचा पराभव केला होता.
सुप्रिया सुळेंनी भास्कर भगरेंना बांधली राखी supriya sule ।
सुप्रिया सुळे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.रात्री उशिरा त्या नाशिकमध्ये पोहोचल्या. नाशिकमध्य पोहोचताच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडमध्ये मेळावा झाला. त्यानंतर खासदार भास्कर भगरे यांचे औक्षण करून सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधली.
नाशिक दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे (@BhaskarBhagare) यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. याप्रसंगी भगरे कुटुंबिय उपस्थित होते. सर्वांना भेटून आनंद झाला. pic.twitter.com/Puz4WYbemj
— Supriya Sule (@supriya_sule) August 18, 2024
सुप्रिया सुळे आज नाशिकमध्येच असणार supriya sule ।
आज दिवसभर सुप्रिया सुळे या नाशिकमध्येच असणार आहेत. रक्षाबंधन दिनाला त्या येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेतील. त्यामुळे त्या उपमुख्यमंत्री बंधू अजित पवार यांच्याबरोबर रक्षाबंधन सण साजरा करणार का? भापल्या मोठ्या भावाला त्या राखी बांधणार का? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बहीण-भावांच्या जोडीला फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश ओळखतो. सुप्रिया सुळे दरवर्षी अजित पवार यांना राखी बांधतात. त्यांच्या या रक्षाबंधनाची माध्यमांतही चर्चा होते.
पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती बदलली आहे. अजित पवार यांनी बंड करून भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे. सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे. तर खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर बसलेला आहे. सुप्रिया सुळे या आपले वडील शरद पवार यांच्या पक्षात आहेत. म्हणजेच सध्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.





