Who is Sachin Sanap : पुणे शिक्षक निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा; शिवसेनेची साथ लाभलेले सचिन सानप कोण?
Who is Sachin Sanap : या मतदार संघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे मैदानात उतरणार होते. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्षाध्येशानंतर माघारी घेतला. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

Who is Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या मतदार संघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे मैदानात उतरणार होते. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्षाध्येशानंतर माघारी घेतला. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
कोण आहेत प्रा. सचिन सानप?
सचिन सानप हे केवळ राजकीय क्षेत्रातील उमेदवार नसून, त्यांना शिक्षण आणि प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे. ते पुण्यातील नामांकित नवरोजी वाडिया महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून, सध्या पीएचडीसाठी संशोधन सुरू आहे. याशिवाय, पुण्यातील प्रतिष्ठित मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवासोबतच संस्थात्मक कामकाजाचाही त्यांना परिचय आहे.
मंत्रालयातील कामकाजाचा अनुभव
प्रा. सानप यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही काम केले आहे. यामुळे त्यांना मंत्रालयातील कामकाज, शासकीय धोरणांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय प्रक्रियांचा जवळून अनुभव मिळाला आहे.
शिक्षकांचे प्रश्न आणि ‘प्रत्यक्ष शिक्षकच आमदार’ हा मुद्दा
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रा. सचिन सानप यांनी शिक्षकांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे. ‘शिक्षकांचा आमदार हा केवळ राजकीय व्यक्ती किंवा संस्थाचालक नसून प्रत्यक्ष शिकवणारा शिक्षक असावा.’ अशी त्यांची भूमिका आहे.
तिरंगी लढतीकडे लक्ष
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपकडून कौस्तुभ गावडे, काँग्रेसकडून जयंत आसगावकर आणि अपक्ष म्हणून सचिन सानप यांच्यात तिरंगी लढत होण्याचे चित्र आहे. त्यात शिवसेनेने सानप यांना दिलेला पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे. आता अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात असलेल्या सचिन सानप यांची प्रचाराची रणनीती काय असेल, शिक्षक मतदारांचा त्यांना कितपत प्रतिसाद मिळेल आणि या नव्या राजकीय समीकरणाचा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Brijbhushan Singh : “CJP चं आंदोलन एलॉन मस्कच्या सांगण्यावरून सुरु” ; ब्रिजभूषण शरण सिंह यांचा आरोप





