बारावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये
Updated On:

पुणे : इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा (सप्लिमेंटरी) जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी 10 जून पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.
या परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे आयटीआय, ट्रान्स्फर ऑफ क्रेडीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात येणार आहेत. www. mahahssboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत.
विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज भरण्यासाठी 17 जूनपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी 18 ते 21 जून अशी मुदत देण्यात आलेली आहे. विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्यासाठी 22 जूनची मुदत दिलेली आहे.





