#IPL2021 : राजस्थानपाठोपाठ हैदराबादसाठी नामुष्की
Updated On:

दुबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या पर्वात राजस्थान रॉयल्सपाठोपाठ सनरायझर्स हैदराबादने पॉवर प्लेमध्ये आजवरची सर्वांत नीचांकी धावसंख्या नोंदवली.
राजस्थानने दिल्लीविरुद्ध पॉवर प्लेमध्ये 21 धावा केल्या. यंदाच्या मोसमातील ही पॉवर प्लेमधील सर्वांत कमी धावसंख्या आहे.
दुसऱ्या सामन्यात हैदराबादने पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना पहिल्या 6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये 2 बाद 20 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्लेमधील ही त्यांची सर्वांत नीचांकी धावसंख्या ठरली.





