सनी देओलच्या ‘रामायण’मधील खास भूमिकेवर शिक्कामोर्तब

Sunny Deol | दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यातच या सिनेमात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. यावर आता खुद्द सनीने शिक्कामोर्तब केला आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना सनी देओल म्हणाला, “रामायण हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. ‘अवतार’ आणि ‘प्लॅनेट ऑफ द एप्स’ सिनेमांप्रमाणेच मोठ्या स्केलवर रामायण बनवण्याचा मेकर्सचा प्रयत्न आहे. ते सर्व टेक्निशियन याचा भाग आहेत. सिनेमा कसा असणार आणि प्रत्येक भूमिका तशी सादर केली जाणार याबाबतीत लेखक आणि दिग्दर्शक स्पष्ट आहेत.”
ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’मधील परिस्थितीवर ज्याप्रकारे टीका झाली होती, त्यावरून सनी देओलने त्याच्या चाहत्यांना आश्वासन दिले आहे की, यात असे स्पेशल इफेक्ट्स पाहायला मिळतील की ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. मला खात्री आहे की हा सिनेमा खूप चांगला होणार आहे आणि नक्कीच प्रत्येकाला सिनेमा आवडेल,” असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
‘रामायण’चे हे दोन्ही चित्रपट 2026 आणि 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. या पोस्टमध्ये ‘रामायण: भाग 1’ दिवाळी 2026 ला रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या दुसऱ्या भागासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. 2027 मध्ये दिवाळीला रिलीज होणार आहे.
हेही वाचा:
“इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांच्या हाती द्यावी”; लालू प्रसाद यादव यांचा काँग्रेसला झटका





