Sunny Deol and Preity Zinta: सनी देओलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार प्रीती झिंटा; ‘लाहोर १९४७’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Sunny Deol and Preity Zinta: बॉलीवूड अभिनेता सनी देओल अलिकडेच ‘बॉर्डर 2’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. त्यानंतर आता त्याचा आगामी चित्रपट ‘लाहोर १९४७’ अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये सनी देओलसोबत प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत असून बऱ्याच काळानंतर ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.
प्रिती झिंटा बऱ्याच वर्षांनी स्क्रीनवर दिसणार आहे. तिने कमबॅक केल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. यातच तिच्यासोबत सनी देओल दिसणार असल्याने त्यांची जोडी पाहणे चाहत्यांसाठी एक पर्वणी असणार आहे.
याचदरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, हा चित्रपट १३ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सनी देओल पुन्हा एकदा एका ऐतिहासिक आणि तितक्याच प्रभावी भूमिकेत दिसणार आहे. Sunny Deol and Preity Zinta:
View this post on Instagram
विशेष म्हणजे या सिनेमाची आमिर खानने निर्मिती केली आहे, तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटानिमित्त सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांची जोडी ‘घायल’ आणि ‘दामिनी’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र येत आहे. तसंच शबाना आझमी, अली फजल आणि अभिमन्यू सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यात सनी देओलचा मुलगा करण देओलही झळकणार आहे. Sunny Deol and Preity Zinta
दरम्यान, 90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री प्रिती झिंटाने 1998 साली ‘दिल से’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. प्रिती झिंटाने 2016 साली परदेशी बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत लग्न केले. जीन तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असून जीन गुडइनफ लॉस एंजेलिसमध्ये फायनान्स अॅनालिस्ट आहेत. 2021 साली सरोगसीच्या माध्यमातून ती जुळ्या मुलांची आई झाली. यानंतर आता तिने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक केले आहे. Sunny Deol and Preity Zinta
हेही वाचा:





