सुनिताच्या ‘त्या’ कृतीमुळे पुन्हा रंगली गोविंदासोबतच्या घटस्फोटाची चर्चा; म्हणाली…

Sunita Ahuja And Govinda | अभिनेता गोविंदा मागील काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांदरम्यान सुनिताच्या कृतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सुनीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘आहुजा’ हे आडनाव काढून टाकलं. तिने तिच्या सुनीता या नावापुढे इंग्रजीतील ‘एस’ हे अक्षर जोडलं आहे. मात्र यावर तिने स्पष्टीकरण दिले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सुनीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आडनाव काढण्यामागचं कारण अंकशास्त्र असल्याचं म्हटलं आहे. अंकशास्त्रानुसार सुनीताने तिच्या नावात बदल केला आहे आणि हा बदल गेल्या एक वर्षापूर्वी केला असल्याचेही तिने सांगितलं.
तिने असेही स्पष्ट केलं की, “मी माझ्या नावातून ‘आहुजा’ काढलं नाही आणि हे कधीच होणार नाही. फक्त अंकशास्त्रासाठी मी माझ्या पहिल्या नावात ‘S’ वाढवलं आहे. आम्ही अजूनही एक आनंदी कुटुंब आहोत. गोविंदासोबत माझं नातं घटस्फोटापर्यंत गेलं आहे, या अफवा निराधार आहेत. जोपर्यंत आम्ही दोघं अधिकृतपणे काही बोलत नाही, तोपर्यंत काहीही गृहीत धरू नका. मी हे जग सोडून जाईन तेव्हाच ‘आहुजा’ हे आडनाव कायमचं काढलं जाईल. मी अजूनही गोविंदाची पत्नी आहे आणि आम्ही एक आनंदी कुटुंब आहोत”,
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांचं 1987 मध्ये लग्न झालं होतं. गोविंदा व सुनीता यांना 1988 मध्ये मुलगी झाली, तिचं नाव टीना आहे. तर मुलाचे नाव यशवर्धन आहे.
हेही वाचा :
चाहत्यांना लग्नाची प्रतिक्षा! विजय-रश्मिका एकाच कारमधून रवाना; मुंबई विमानतळावर काय घडलं?





