Sunita Williams : सुनिता विल्यम्स, बुच विल्मोरचा विक्रमी स्पेसवॉक !

वॉशिंग्टन डीसी – अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी गुरुवारी ६.५ तास स्पेसवॉक करून एक इतिहास निर्माण केला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये त्यांनी हा स्पेस वॉक केला. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम जमा झाला आहे.
सुनिता विल्यम्स यांचा यांचा हा नववा स्पेसवॉक होता. तर विल्मोर यांचा हा पाचवा स्पेस वॉक होता. नासाने आतापर्यंत ६५ तासांच्या स्पेसवॉकची कामगिरी केली आहे. त्यातील ६.५ तासांच्या स्पेसवॉकची कामगिरी सुनिता विल्यम्स यांच्या नावावर जमा झाल्यामुळे त्या नासाच्या स्पेसवॉक करणाऱ्या अंतराळवीरांच्या यादीतले चौथ्या क्रमांकावरील अंतराळवीर ठरल्या आहेत.
सर्वाधिक स्पेसवॉकचा विक्रम सध्या रशियन फेडरल स्पेस एजन्सीच्या अनातोली सोलोव्हयेव्ह यांच्याकडे आहे, त्यांनी १६ ईव्हीएमध्ये ८२:२२ तास वेळ दिला आहे. त्यानंतर नासाचे मायकेल लोपेझ-अॅलेग्रिया १० ईव्हीएमध्ये ६७:४० तासांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ही यादी ९ ऑगस्ट २०२३ रोजीची आहे.
स्पेसवॉक दरम्यान, या दोघांनी त्यांचे प्राथमिक उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केली, त्यांनी सदोष रेडिओ फ्रिक्वेन्सी ग्रुप अँटेना असेंब्ली काढून टाकली आणि डेस्टिनी प्रयोगशाळा आणि क्वेस्ट एअरलॉकमधून पृष्ठभागाच्या सामग्रीचे नमुने गोळा केले. याच कामासाठी त्यांना हा स्पेसवॉक करायला लागला होता.
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे जून २०२४ पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्याच्या कामगिरीवरील बोईंग स्टर्लिंग स्पेसक्राफ्टमधून वायू गळती होत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे नासाने या दोघांनाही अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातच सुरक्षित राहू देण्याचा निर्णय घेतला. त्यांना या वर्षी मार्चमध्ये या अंतराळ स्थानकातून परत आणले जाण्याची शक्यता आहे.





