सुनील टिंगरे यांना विजयी करायचे; कार्यकर्त्यांचा निर्धार

विश्रांतवाडी – 2014 च्या निवडणुकीत आमदार होण्याची सुनील टिंगरे यांची संधी थोडक्यात हुकली होती. यंदा मात्र ही संधी हातून जाऊ द्यायची नाही. तर माजी आमदार बापू पठारे यांच्यासह पक्षाच्या नेत्यांची खंबीर साथ असल्याने टिंगरे यांना भरघोस मतांनी विजयी करायचे, असा निश्चय कार्यकर्त्यांनी केला आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील उमेदवार सुनील टिंगरे यांनी खराडी परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. यावेळी त्याच्यासमवेत माजी आमदार बापू पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका सुमन पठारे, भैय्यासाहेब जाधव, बाळासाहेब पठारे, माऊली कळमकर, गुलाब पठारे, धीरज पठारे, सतीश कुसमाडे, सोमनाथ साबळे, रवींद्र पठारे, किरण खैरे, सोमनाथ साबळे, नीताताई गलांडे आदी उपस्थित होते.
खराडीत पदयात्रेदरम्यान महिलांनी टिंगरे यांना औक्षण केले. तर, दुपारनंतर धानोरी, भैरवनगर, आनंदपार्क परिसरामध्ये बैलगाडीतून प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले.





