Pune District : रांजणगाव विविध विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनिल खेडकर यांची बिनविरोध निवड
Pune District : अध्यक्ष पदाच्या निवडीकरीता अध्यासी अधिकारी श्री. पी. व्ही. हराळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार (दि. २९) रोजी रांजणगाव गणपती (ता. शिरुर) या ठिकाणी संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.

रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुनील पांडुरंग खेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती सोसायटीच्या सचिव आरती शेळके-गोरे यांनी दिली. मावळते चेअरमन सतिश फक्कड शेळके यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर चेअरमन पदी सुनील खेडकर यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष पदाच्या निवडीकरीता अध्यासी अधिकारी श्री. पी. व्ही. हराळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार (दि. २९) रोजी रांजणगाव गणपती (ता. शिरुर) या ठिकाणी संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.
याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख व सोसायटीचे माजी चेअरमन बापूसाहेब शिंदे, माजी पं.स. सदस्य विक्रम पाचुंदकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद,व्हा. चेअरमन विलास चांगदेव पंचमुख, माणिक खेडकर, महेश निवृत्ती फंड, हर्षल गदादे, आत्माराम खेडकर आनंदा खेडकर, श्रीराम खेडकर, ॲड. अतुल खेडकर, ॲड. आदित्य मैड, रवि लेंडे, बाळासाहेब फंड, संजय खेडकर, अनिता खेडकर सुखदेव भुजबळ, रवींद्र बत्ते, उत्तम तुकाराम कुटे, फक्कड यशवंत धुमाळ, राजेश दत्तु लांडे, गोरक्ष गणपत गदादे, कैलास सावळेराम लांडे, विष्णु भाऊसाहेब साळुंके, सुनिता शिवाजी देवकर, संगिता गणेश लांडे, सतिष फक्कड शेळके, यांसह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





