Pune | सुनील कांबळे ठरले ‘गेमचेंजर’

पुणे, – कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा निवडणून येत आमदार सुनील कांबळे गेमचेंजर ठरले आहेत. कांबळे यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांचा १० हजार २५६ मतांनी पराभव केला आहे. सुनील कांबळे यांना ७५ हजार ७२६ मते मिळाली, तर बागवे यांना ६५ हजार ४७० मते मिळाली.
या मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत १२ टक्के अधिक मतदान झाले होते. त्यामुळे हा वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये बागवे यांना १ हजार मताधिक्य होते. त्यानंतर पुढील तीन फेऱ्यांत कांबळे यांना थेट साडेसात हजारांचे मतदान मिळाले. त्यानंतर बागवे यांना १५ व्या फेरीपर्यंत चांगली मते मिळाली; पण कांबळेंचे मताधिक्य कायम राहिले. शेवटच्या चार फेऱ्यांमध्ये कांबळे यांचे मताधिक्य १० हजारांवर जाऊन ते विजयी झाले.
गेल्या पाच वर्षांतील विकासकामे व शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे. मतदारांचा विश्वासाला तड जाऊ न देता मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यावर आपला भर राहील. – सुनील कांबळे, विजयी उमेदवार





