‘मोदी बागे’त शरद पवार – सुनेत्रा पवार यांची भेट ? अजितदादा गटाची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Sunetra Pawar । राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाचं कामकाज आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे याप्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली होती. परंतु आज सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
अशात आज अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील मोतीबाग या पवार यांच्या निवासस्थान गेल्या होत्या. पवार यांच्याशी एक तास चर्चा केल्यानंतर सुनत्रा पवार मोदीबागेतून रवाना झाल्या आहे. त्यांच्या या भेटीमागचे कारण अद्यापही समजले नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी खुलासा केला आहे.
Sunetra Pawar । या भेटीवर सूरज चव्हाण नेमकं काय म्हणाले
‘सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी ‘मोदी बागे’त गेल्या होत्या. याच ‘मोदी बागे’त शरद पवारसाहेबांचे देखील निवासस्थान आहे. माध्यमांत वेगवेगळ्या बातम्या चालत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या बातम्या थांबवण्यात याव्या, ही विनंती करतो.’ असेही त्यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही भाष्य केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या ‘मोदी बाग’ येथील भेटीबाबत मला काहीही माहिती नाही. मी माहिती घेऊन बोलेल. ही कौटुंबिक भेट सुद्धा असू शकते. पवारसाहेबांची प्रकृती ठीक नाही. राज्यात काहीही वेगळं चालेलं नाही. महायुतीत सत्तेत येणार हे नक्की.’ असा विश्वास सुनील तटकरेंनी व्यक्त केला.





