सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या भेटीला; नेमकी कोणत्या विषयावर झाली चर्चा?

Sunetra Pawar । राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाचं कामकाज आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे याप्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली होती. परंतु आज सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
अशात आज अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील मोतीबाग या पवार यांच्या निवासस्थान गेल्या होत्या. पवार यांच्याशी एक तास चर्चा केल्यानंतर सुनत्रा पवार मोदीबागेतून रवाना झाल्या आहेत. त्यांच्या या भेटीमागचे कारण अद्यापही समजले नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नुकतीच राष्ट्रवादी फुटल्यानंतर काल छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा पवार यांची भेट घेतली होती. आणि आज सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
तत्पूर्वी, छगन भुजबळ यांनी या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याची माहिती पत्रकार परिषद घेत दिली आहे. या भेटीमध्ये राजकारणाचा कोणताही मुद्दा नव्हता. आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी मी कोणालाही भेटायला तयार असून यावर मार्ग कसा काढायचा याबाबत चर्चा केल्याचे सांगितले. “मी कोणतंही राजकारण घेऊन मंत्री, आमदार म्हणून आलेलो नाही. कोणतीही पक्षीय भूमिका नाही. पण महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आरक्षण देण्याचे काम तुम्ही राबवले आणि आता राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे कीराज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे,” असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
“राज्यात ओबीसी आरक्षण देण्याच काम पवारांनी केले. आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती आहे. मी त्यांना विनंती केली की तुम्हाला राज्याचा चांगला अभ्यास आहे. जातीजातींमध्ये वातावरण शांत राहवे यासाठी तिथे शरद पवार असले पाहिजे, अशी माझी मागणी होती,” असं छगन भुजबळ म्हणाले.





