Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आज उपराष्ट्रपतींची भेट घेऊन राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत.
Sunetra Pawar: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर त्या अमित शाह यांनाही भेटणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार, जय पवार यांच्यासह प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित आहेत.
विशेष म्हणजे, सुनेत्रा पवारांच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते, तेथे त्यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. यात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. जर राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होईल.
Drishyam 3 Film : अक्षय खन्ना दृश्यम ३ मधून बाहेर; ‘या’ सुपरस्टार अभिनेत्याची होणार एन्ट्री
राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार
याशिवाय सुनेत्रा पवार आज उपराष्ट्रपतींची भेट घेऊन राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. Sunetra Pawar:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या भवितव्याच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत निर्णायक मानला जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Sunetra Pawar:
हेही वाचा :






