Sunetra Pawar। राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच राज्यात या निवडणुकीत सर्वात रोमांचकारी लढत बारामती लोकसभा मतदारसंघात होणार असल्याचे दिसत आहे. कारण विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
सुप्रिया सुळे याच महाविकास आघाडीच्या बारामतीच्या अधिकृत उमेदवार असतील. दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा महायुतीत अजित पवार गटाला मिळणार असल्याचं निश्चित मानलं जातय. अजित पवार गट सुनेत्रा पवारांसाठी या मतदारसंघात मोर्चेबांधणी करत आहे. परंतु, अजित पवार गटाने सुनेत्रा पवारांची उमेदवारी अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
सुनेत्रा पवार यांनी बारामतीत आपला जनसंपर्क वाढवला Sunetra Pawar।
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांनी बारामतीत आपला जनसंपर्क वाढवला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुनेत्रा पवार हजेरी लावत आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. अशातच बारामतीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार यानी बारामतीकरांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत साथ देण्यासाठी साद घातली आहे.
तुमची साथ असेल तर मी लवकरच मोठं पाऊल उचलणार Sunetra Pawar।
सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुमची साथ असेल तर मी लवकरच मोठं पाऊल उचलणार आहे. आपल्या सर्वांच्या भल्यासाठी मी मोठं पाऊल उचलणार आहे. तुम्ही फक्त काही दिवस आम्हा सर्वांसाठी (राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील उमेदवार) काम करायचं आहे. बारामतीकरांनी, बारामतीतल्या सर्व माता भगिनिंनी आणि जनतेने आजपर्यंत अजित पवारांना साथ दिली आहे. सर्वजण नेहमीच अजित पवारांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. तुम्ही इथून पुढेही त्यांच्या पाठिशी उभे राहणार आहात याची मी खात्री बाळगते.