Sujay Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे पाटलांची निवड, तर उपाध्यक्षपदी…
Sujay Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी झाली होती निवडणूक

Sujay Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया आज पार पडली. यात सहकार पॅनेलकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तर बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजित देशमुख यांचीही बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय विरोधक असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे एकत्र आलेले पाहायला मिळाले. तसेच या दोन्ही विरोधकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सहकार पॅनेलकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक झाली होती. यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील विरोधक एकत्र येत स्थापन केलेल्या ‘सहकार पॅनल’ मैदानात होते. तर त्याविरुद्ध खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील ‘परिवर्तन पॅनल’ होते. यांच्यात झालेली लढत महत्वपूर्ण ठरली होती.
हेही वाचा:




