Suicide News : धक्कादायक ! हॉटेल मालकाच्या त्रासाला कंटाळून मॅनेजरची आत्महत्या
बीड तालुक्यातील चौसाळा येथील हॉटेल जानकीचे मॅनेजर सतीश जाधव यांनी हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केल्याची घटना समोर आली आहे.

Suicide News : बीड तालुक्यातील चौसाळा येथील हॉटेल जानकीचे मॅनेजर सतीश जाधव यांनी हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केल्याची घटना समोर आली आहे. हॉटेल मालक आणि त्यांच्या भावाकडून सुरू असलेल्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात हॉटेल मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा (Suicide News) दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, बीड परिसरातील चौसाळा येथील हॉटेल जानकीमध्ये सतीश जाधव हे मॅनेजर म्हणून काम पाहत होते.
परंतु, मागील काही काळापासून हॉटेल मालक दशरथ थोरात आणि त्याचे भाऊ विकी थोरात हे ग्राहकांच्या उधारीच्या पैशांवरून आणि इतर व्यावसायिक कारणांवरून जाधव यांच्यावर सतत दबाव टाकत होते. उधारीच्या पैशांवरून त्यांना वारंवार शिवीगाळ करणे, मानहानी करणे असा प्रकार मालकांकडून सुरू होता. या सततच्या त्रासामुळे जाधव हे तीव्र मानसिक तणावाखाली आले होते.






