सुहाना खानचा ट्रॅडिशनल अंदाज; फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Suhana Khan – शाहरुख खानची लेक सुहाना खान सध्या चर्चेत आहे. सुहानाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली असून नुकताच तिचा पहिला चित्रपट ‘द आर्चीज’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. सुहानासोबतच अमिताभ बच्चन यांचा नात अगस्त्य नंदा आणि बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर यांनीही या चित्रपटातून डेब्यू केला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गुरुवारी रात्री सुहाना खान झोया अख्तरच्या घरी दिसली. पिवळ्या रंगाच्या एथनिक वेअरमध्ये स्टारकिड सुहाना खान खूपच सुंदर दिसत होती.
सुहाना खानच्या डेब्यू चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, याचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. द आर्चीज हा एक भारतीय थेट-अॅक्शन संगीतमय चित्रपट आहे. हा किशोरवयीन म्युझिकल कॉमेडी चित्रपट पॉपअप अमेरिकन कॉमिक्सवर आधारित आहे. सुहाना, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्याशिवाय आदिती सहगल, वेदांग रैना, युवराज मेंडा आणि मिहिर आहुजा यांनीही आर्चीजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आर्चिसला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: चित्रपटातील सुहाना खानच्या अभिनय आणि नृत्य कौशल्याचे खूप कौतुक केले जात आहे.





