मुंबई – बॉलीवूडमधील किंग खान अर्थात शाहरुख खानची मुलगी ‘सुहाना खान’ सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. सुहानाची सोशलवर फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. इंस्टाग्रामवर देखील सुहानाचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून, फॅन्स देखील तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकवर फिदा होत असतात.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या सुहानाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये सुहानाचा खूपच मस्त आणि कम्फर्टेबल लूक पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे. यावेळी तिने पांढरा आणि निळा मिडी ड्रेस परिधान केला आहे. विमानतळाच्या आत जाण्यापूर्वी तिने पापाराझींना हसतमुख पोझही दिली.
सुहानाने व्हाइट स्नीकर्स, सोन्याचे ब्रेसलेट आणि हँडबॅगसह आपला लूक पूर्ण केला. त्याचबरोबर तिने हलका मेकअप देखील केल्याचं पाहायला मिळत आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. दरम्यान, सुहाना खान लवकरच चित्रपट दिग्दर्शिका झोया अख्तरच्या आगामी ‘द आर्चीज’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय खुशी कपूर, अगस्त्य नंदा कपूर आणि वेदांग रैना हे देखील दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.