साखर उत्पादन वाढणार 12 टक्क्यांनी
Updated On:

मुंबई – ऑगस्ट 2020 ते सप्टेंबर 2021 या साखर वर्षांमध्ये साखरेचे उत्पादन 12 टक्क्यांनी वाढून 30.5 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उसाचे उत्पादन जास्त झाल्यामुळे साखर उत्पादन वाढणार आहे. इथेनॉलसाठी ऊस उपलब्ध होऊनसुद्धा साखरेचे उत्पादन वाढेल, असे ईक्रा या संस्थेने म्हटले आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उसाचे उत्पादन कमी झाले होते. मात्र, यावर्षी हवामानविषयक परिस्थिती चांगली असल्यामुळे उसाचे उत्पादन वाढणार आहे. साखरेचा 11.5 दशलक्ष टन साठा शिल्लक आहे.





