अचानक समोर लुलिया वंतूर आली अन्….; मलायकाने केली ‘ही’ कृती, व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

Malaika viral video : बॅालिवूड इंडस्ट्रतील जलवा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असते. मलायकाच्या हटके ड्रेसिंग स्टाइलवर तिचे चाहते फिदा आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, यामुळे मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मलायका अरोराने काही वर्षांपूर्वी अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज याला घटस्फोट दिला. त्यानंतर ती खान कुटुंबासोबत फारशी कुठे दिसली नाही. त्यानंतर तब्बल ६ वर्षं अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांना डेट करत होते. अखेर २०२४ त्यांचा ब्रेकअप झाला.
काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत मलायका स्पॅाट झाल्यामुळे तिच्या डेटिंगच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. अशातच एका रॅम्प वॅाक कार्यक्रमात मलायकाने सलमान खानची कथित प्रेयसी लुलिया वंतूर हिला मिठी मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
शनिवारी रात्री मलायका अरोराने डिझायनर ड्रेसमध्ये रॅम्प वॉक केला. चाहत्यांना तिचा लूक स्टाईल आणि वॉक खूपच आवडला. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. रॅम्प वॉकनंतर, मलायका स्टेजच्या मागे जात असताना अचानक तिच्यासमोर लुलिया वंतूर आली. लुलियाला पाहून मलायका आश्चर्यचकित झाली. त्यानंतर लुलिया वंतूरला मलायकाला मिठी मारली. यावेळी दोघे एकमेकांशी बोलल्या असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
चाहत्यांना मलायका अरोराचा लूक आणि हटके स्टाईल खपूच आवडली, तर त्यांना लुलिया आणि मलायका एकमेंकाना भेटताना पाहून खूप आनंद झाला. नेटकऱ्यांनी मलायका आणि लुलिया यांना बहिणी म्हटले आहे. अनेक चाहत्यांनी मलायका आणि लुलिया दोघांसाठीही हार्ट इमोजी व्हिडीओच्या कमेंट्समध्ये शेअर केले आहेत.
हेही वाचा : ‘या’ राज्यात भूकंपाचे मोठे धक्के ; प्रशासनाकडून अलर्ट जारी





