Chamoli Earthquake। उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आज सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (एनसीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.७ इतकी होती. चमोली याठिकाणी भूकंपाबाबत, स्थानिक रहिवाशांनी माहिती दिली. हा भूकंप फक्त काही सेकंदांचा होता, त्यामुळे लोक घराबाहेर पडले. जिल्हा प्रशासनान अलर्ट जारी केला असून मदत पथकेदेखील तैनात केली. समोर आलेल्या माहितीनुसार, कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.Chamoli Earthquake। दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी रुद्रप्रयाग जिल्ह्यात ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या भूकंपामुळे रुद्रप्रयाग जिल्हा रुग्णालय, कोटेश्वरमधील एक इमारत आणि उद्योग विभागाच्या इमारतीलाही फटका बसला. यापूर्वी, १४ ऑक्टोबर रोजी उत्तरकाशीत ३.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. Chamoli Earthquake।