पिंपरी | अशी पाखरे येती…

कामशेत, (वार्ताहर) – अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती, असे म्हणत आपल्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी परत एकदा शाळेच्या प्रांगणात जमली. निमित्त होते कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयातील २०१० मधील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे.
तब्बल १४ वर्षानंतर स्नेहसंमेलनाच्या निमित्त ४५ माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले आणि आठवणीत हरवून गेले होते. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. सर्वंजण शाळेतील आठवणीना उजाळा देत होते. या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित नेहरू विद्यालयाच्या मुख्यध्यापिका होत्या.
तर, प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. सर्वांनीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशा कार्यक्रमाच्या आयोजनातून सर्वांना आयुष्य जगण्यासाठी ऊर्जा मिळते. आयुष्यात आपल्या आई-वडिलांची, सासू-सासऱ्याची, घरच्यांची, समाजाची सेवा करावी. आपल्या पुढील पिढीवर चांगले संस्कार घडवावे, असे सांगितले.
सूत्रसंचालन माजी विद्यार्थी समीर भोसले यांनी केले. प्रास्ताविक स्नेहल गरुड यांनी केले. आभार आदेश वंजारी, सुनील वाजे यांनी मानले. या वेळी शाळेचे माजी विद्यार्थी वैभव शिंदे, विशाल मांदळे, दिनेश भानुसघरे, सुरज पुरी, अक्षय पठाडे, किरण वाघमारे, रोशन शेडगे, विशाल पवार, सोमनाथ खेंगले, स्वप्नील मोरे, सचिन पवार, उल्हास शिंदे, सद्गुरू काजळे, शरद वाघुले,
अमित गायकवाड, सतीश वावरे, वैभव देशमुख, प्रदीप पिंगळे, मच्छिंद्र बालगुडे, शंकर प्रजापती, हितेश जैन, करण काळे, अनिकेत मेदगे, अक्षय मुळे तसेच सुजाता गरुड, प्रियांका आडकर, निलम चव्हाण, स्नेहल गायकवाड, किरण तारू, स्वाती वावरे, पूजा गुगळे, अर्चना गायकवाड, रेश्मा गायकवाड, रेश्मा काळडोके, माधुरी हजारे, साधना शिंदे आदी उपस्थित होते.





