‘इतकी कमाल गोष्ट…’; काजोलची भेट होताच सोनाली कुलकर्णी भावुक
Sonali Kulkarni | अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बॉलिवूड अभिनेत्री काजोलची मोठी चाहती आहे. लहानपणापासून तिला काजोलला भेटण्याची खूप इच्छा होती. अखेर तिची ही इच्छा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात पूर्ण झाली. दोघींच्या ही भेटीचा व्हिडीओ सोनालीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच
काजोलला भेटल्यानंतर सोनालीने तिच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. सोनालीने ५ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात काजोलच्या काही लोकप्रिय गाण्यांवर नृत्यसादरीकरण केलं. यानंतर काजोलने सोनालीला मिठी मारत दाद दिली. यानंतर सोशल मीडिया पोस्टद्वारे सोनालीने आनंद व्यक्त केला आहे.
सोनालीने पोस्टमध्ये लिहिले की, “काजोलची मी अगदी लहानपणापासूनच मोठी चाहती आहे. ‘मेरे ख्वाबों में जो आए’सारख्या तिच्या सगळ्या गाण्यांवर आरश्यासमोर थिरकत राहिलीये. अशातच महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार सोहळ्यात तिच्या समोर, तिच्यासाठी सादरीकरण करण्याची संधी मिळाली. ही इतकी कमाल गोष्ट आहे की, ती खरं तर मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तिच्या निखळ अभिनयाने, स्वच्छंदी स्वभावाने, तसंच ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन असलेल्या जिवंतपणाने, बिनधास्तपणे जगण्याच्या वृत्तीने, निरागसपणाने कायमच मला भुरळ घातली आहे.” Sonali Kulkarni |
View this post on Instagram
पुढे सोनाली म्हणते, “माझ्या सादरीकरणानंतर मिळालेल्या तिच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी काय म्हणावे… एका सच्च्या कलाकाराने एका कलाकाराचे असे कौतुक करावे. हे एका उत्तम माणसाचे आणि रसिक असण्याचे चिन्ह. ती मिठी आणि तिचे कौतुकाचे शब्द कायम स्मरणात राहतील. या आधी श्रीदेवी आणि लता मंगेशकर यांना मानवंदना वाचण्याची संधी मिळाली होती; पण त्या नसताना… पण यावेळी काजोलच्या वाढदिवशी, तिच्या गाण्यांवर, तिच्या समोर प्रत्यक्ष नाचता येणं ही एका प्रामाणिक चाहतीकडून या तिच्या सुपरस्टारला छोटीशी भेट आहे.”
दरम्यान, नुकतेच अभिनेत्री काजोल देवगणला राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी तिने मराठी भाषण देत सर्वांची मनं जिंकली होती. Sonali Kulkarni |
हेही वाचा :
“न्यायालयाने शुल्काविरुद्ध निर्णय देऊ नये…” ; डोनाल्ड ट्रम्पकडून महामंदीचा इशारा





