“…असाच धडा शिकवला पाहिजे”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर असदुद्दीन औवेसी यांची प्रतिक्रिया

Operation Sindoor | पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे १५ दिवसांनंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून बदला घेतला आहे. बुधवारी (७ मे) रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
या मोहिमेत भारतीय सेनेनं बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या शहरांमधील अतिरेक्यांच्या तळांवर लक्ष्य साधले. यात भारतीय सैन्यानं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. यानंतर आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांची ऑपरेशन सिंदूर या मोहिमेबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे.
असदुद्दीन औवेसी यांचे ट्वीट
असदुद्दीन औवेसी यांनी सोशल मीडियावर भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर पोस्ट केली आहे. असदुद्दीन औवेसी म्हणाले की, “पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर आमच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यांचं मी स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेट असाच धडा शिकवला पाहिजे, जेणेकरुन दुसरी पहलगामसारखी घटना कधीही घडणार नाही. पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट केल्या पाहिजेत, जय हिंद!” Operation Sindoor |
मैं हमारी रक्षा सेनाओं द्वारा पाकिस्तान में आतंकवादी ठिकानों पर किए गए लक्षित हमलों का स्वागत करता हूँ। पाकिस्तानी डीप स्टेट को ऐसी सख्त सीख दी जानी चाहिए कि फिर कभी दूसरा पहलगाम न हो। पाकिस्तान के आतंक ढांचे को पूरी तरह नष्ट कर देना चाहिए। जय हिन्द! #OperationSindoor
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 7, 2025
दरम्यान, बुधवारी पहाटे भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करून बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा गटांच्या मुख्यालयांना लक्ष्य केलं.
भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं, त्यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील मुरीदके येथील लष्कराचं मुख्यालय यांचा समावेश आहे. Operation Sindoor |
हल्ला कसा झाला?
मुजफ्फराबाद, बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भीमबर, चक अमरु, बाग, कोटली, सियालकोट या नऊ ठिकाणी भारतीय सैन्यदलाने बुधवारी मध्यरात्री एअर स्ट्राईक केला. या कारवाईत तिन्ही दलांनी त्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला. विशेषतः कामिकाझे ड्रोन (लोइटरिंग दारूगोळा) वापरले गेले. ही अशी शस्त्रे आहेत जी थेट शत्रूच्या लक्ष्यावर आदळतात आणि तिथेच स्फोट घडवतात. पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही तळावर हल्ला झाला नाही, फक्त दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, असे लष्कराने स्पष्ट केले. Operation Sindoor |
हेही वाचा:
‘ईट का जवाब पत्थर से, जशास तसे उत्तर’; एकनाथ शिंदेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार





