‘ईट का जवाब पत्थर से, जशास तसे उत्तर’; एकनाथ शिंदेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

Operation Sindoor | पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. बुधवारी (७ मे) रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे १५ दिवसांनंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून हा बदला घेतला आहे. या एअर स्ट्राईकवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्याय मिळाल्याचे म्हणत शिंदेंनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले की, “पाकिस्तानला जशाच तसे उत्तर देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला करारा जवाब दिला आहे. ‘ईट का जवाब पत्थर से’ देण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये ज्या माता, भगिनींचे कुंकू पुसले होते. त्यांचा बदला भारताने आज घेतला आहे. दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करून भारताने या माता, भगिनींना आज न्याय दिला आहे.”
#WATCH | Thane | #OperationSindoor | Maharashtra Deputy CM Eknath Shinde says, “I welcome the actions being taken under Operation Sindoor. I thank PM Modi for that. Innocent people were killed in Kashmir’s Pahalgam in front of their families… Justice has been done. I thank PM… pic.twitter.com/VMvuirhxM3
— ANI (@ANI) May 7, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याद्वारे पाकिस्तानला सडेतोड उत्तर मिळाले आहे. पहलगाम हल्ल्यातील पीडितांना आज न्याय मिळाल्याचे सांगत, त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार एकनाथ शिंदे यांनी मानले आहेत. Operation Sindoor |
भारतीय सैन्याने काय सांगितले ?
ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करताना, भारतीय सैन्याने X वर लिहिले, “न्याय मिळाला. जय हिंद!” मुजफ्फराबादमधील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दहशतवादाला योग्य उत्तर दिले आहे आणि असे दुःख दिले आहे की भावी पिढ्या ते लक्षात ठेवतील. भारताने स्पष्ट केले की केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच हल्ला करण्यात आला, परंतु आजूबाजूच्या इमारतींचे नुकसान झाले.
भारतीय लष्कराने भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबाच्या वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हल्ल्यांसाठी संबंधित ठिकाणे निवडली होती. त्यानंतर हे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताने केलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानने कराची आणि लाहोरचे हवाई क्षेत्र ताबडतोब बंद केले. याशिवाय लाहोर आणि सियालकोट विमानतळ पुढील ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला
२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली होती. दहशतवाद्यांनी पुरूषांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी, भारताने सिंधू पाणी करार निलंबित करण्यापासून ते पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यापर्यंत अनेक निर्बंध लादले. Operation Sindoor |
हेही वाचा:
Pune Gramin News : शिंदोडी येथील दुर्गे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आगळा वेगळा आदर्श





