Video | पिनाक एक्‍स्टेंडेड रेंज सिस्टीमसह अन्य यंत्रणांच्या यशस्वी चाचण्या

Updated On:
Video | पिनाक एक्‍स्टेंडेड रेंज सिस्टीमसह अन्य यंत्रणांच्या यशस्वी चाचण्या

नवी दिल्ली (दि. 11) – पिनाक एक्‍स्टेंडेड रेंज, एरिया डिनायल म्युनिशन आणि स्वदेशी बनावटीच्या फ्यूजच्या यशस्वी चाचण्या करण्यात आल्या आहेत. पिनाका मल्टी बॅरल अग्निबाण प्रक्षेपण प्रणालीची पोखरण रेंजवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात “डीआरडीओ’च्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट आणि उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेने संयुक्‍तपणे ही प्रणाली विकसित केली आहे.

“डीआरडीओ’ने लष्कराच्या बरोबर मिळून गेल्या तीन दिवसांत या अग्निबाणांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारी चाचणी घेतली. या चाचण्यांमध्ये अद्ययावत श्रेणीतील पिनाक अग्निबाणांची विविध क्षमतांसह चाचणी घेण्यात आली. चाचणीची सर्व उद्दिष्टे समाधानकारकपणे पूर्ण झाली. अचूकता आणि सुसंगततेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी 24 अग्निबाण डागण्यात आले, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पिनाक-ईआर ही पूर्वीच्या पिनाकची अद्ययावत आवृत्ती आहे आणि गेल्या दशकापासून भारतीय लष्कराच्या सेवेत आहे. पुण्यातील “एआरडीई’ द्वारे पिनाकसाठी केलेले आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाअंतर्गत उद्योग भागीदारांनी उत्पादित केलेल्या एरिया डिनायल म्युनिशनचीही यशस्वी चाचण्या झाल्या.

दरम्यान, ही प्रणाली विकसित केल्याने अग्निबाण माऱ्याची क्षमता विकसित झाली आहे. चीनपासून निर्माण झालेले संरक्षणाचे आव्हान विचारात घेता हे मोठे यश मानावे लागेल. भारत एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही सीमांवर संघर्ष करत आहे. चीनबरोबर मेजर पातळीवर चर्चेच्या 13 फेऱ्या होऊनही अद्याप प्रत्यक्ष ताबारेषेवरील तणाव कमी झालेला नाही.

आणखी संबंधित बातम्या

Putin on Zhelensky: युक्रेनची राजधानी कीव उद्ध्वस्त ; झेलेन्स्कींच्या 'त्या' वक्तव्यांमुळे पुतिन संतापले

2026-09-02 14:47:47

Putin on Zhelensky: युक्रेनची राजधानी कीव उद्ध्वस्त ; झेलेन्स्कींच्या 'त्या' वक्तव्यांमुळे पुतिन संतापले

Sikkim Flood : सिक्कीमच्या पुरात आतापर्यंत 18 ठार, 98 बेपत्ता; एनडीआरएफकडून बचावकार्य राबवण्यात येणार

2023-10-06 11:03:45

Sikkim Flood : सिक्कीमच्या पुरात आतापर्यंत 18 ठार, 98 बेपत्ता; एनडीआरएफकडून बचावकार्य राबवण्यात येणार

Video | पुण्यात खड्ड्यांना भाजप नेत्यांची नावं देत शिवसेनेने केलं अनोखे आंदोलन

2021-10-19 22:16:58

Video | पुण्यात खड्ड्यांना भाजप नेत्यांची नावं देत शिवसेनेने केलं अनोखे आंदोलन