सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची यशस्वी चाचणी
Updated On:

भुवनेश्वर : संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) ने मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपुर येथे क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची यशस्वी चाचणी केली.
ब्रह्मोसला डीआरडीओ एरोस्पेसने डिझाइन केले आहे. हे क्षेपणास्त्र २९०किमी पर्यंत हल्ला करण्यास सक्षम आहे. यात ३०० किलोग्रॅम वजन घेऊन देसखील हवेत उडू शकते. या क्षेपणास्त्रची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
हे जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र जहाज, पाणबुड्या, विमान आणि जमिनीवरून मारा करू शकते.
क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि रशियन फेडरेशनच्या एनपीओ मशिनोस्ट्रोएनिया यांच्यातील संयुक्त उद्यम आहे. या क्षेपणास्त्राचे २००७ मध्ये प्रथम भारतीय सैन्यात दाखल करण्यात आलं होत.





