‘चांद्रयान 2’चे चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश

नवी दिल्ली – इस्रोचा महत्वकांक्षी प्रोजेक्‍ट असणारा चांद्रयान 2ने आज अखेर चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली.

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 2 ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील असे इस्त्रोकडून सांगण्यात आले.

विक्रम लॅंडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा होईल. सात सप्टेंबरला लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एमके 3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे 22 जुलैला चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)