घुमरी येथील उपकेंद्रामुळे विजेची समस्या सुटणार : आ. पवार
Updated On:

कर्जत – महाविकास आघाडी सरकारच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कर्जत तालुक्यातील घुमरी येथील 2 कोटी 2 लाख रुपये किमतीच्या 33/11 केव्ही नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन आ. रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले.
घुमरी येथे नवीन वीज उपकेंद्र झाल्यामुळे परिसरातील घुमरी, थेरगाव, निमगाव गांगर्डा, बेलगाव व नागमठाण या गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 6 गावांवर पूर्वी येणारा ताणदेखील पूर्णपणे कमी होणार आहे. सध्याच्या 5 गावांत पूर्ण आणि उच्च दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आ. पवारांच्या प्रयत्नातून लिंक लाईन व उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे.





