‘हर हर महादेव’मध्ये सुबोध भावे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

मुंबई – ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या घोषणेनंतर मार्च महिन्यात चित्रपटाचा मोशन पोस्टर व्हिडीओ समोर आला होता. ज्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः आवाज दिला होता. त्यानंतर या चित्रपटाबाबत उत्कंठा चांगलीच वाढली होती. आता या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे.
‘हर हर महादेव’ चित्रपटाचा एक पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. ज्यात सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. गळ्यात कवड्यांची माळ,मोठी दाढी,हातात तलवार आणि पाठमागून उगवलेला सूर्य असं हे पोस्ट आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या दाढीमध्ये दिसणाऱ्या सुबोध भावेला चाहत्यांना देखील ओळखणे अवघड झाले आहे.
Presenting to you Subodh Bhave in the greatest and most difficult role of his life… in the role of my Chhatrapati. @Mangesh_Kul #DivinityPictures @ZeeStudios_ @zeemusicmarathi @zeemarathi @zeetalkies @Zee_Yuva @ZEE5Marathi @zee5india#ZeeStudios #HarHarMahadev #Diwali2022 pic.twitter.com/3MyCZk2Xsp
— Abhijeet Deshpande (@unbollywood) September 3, 2022
झी स्टुडिओजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. आणखी दिग्गज अभिनेते देखील या चित्रपटात दिसणार आहेत. ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिजित देशपांडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.





